लोह्यातील अपघातात आयचर चालक जागीच ठार तर एक गंभीर जखमी

1,220

लोहा, नांदेड –

नांदेड – लातूर राष्ट्रीय महामार्गावर लोहा शहरातील नाना नगर जवळील गतिरोधकवर समोरील वाहनाचा वेग कमी झाला असता पाठीमागील भरधाव वेगातील आयचर वाहन समोरील गाडीवर जोरदार आदळून त्यात 34 वर्षीय आयचर चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.१५ रोजी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास घडली. तर क्लिनर गंभीर जखमी झाला असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली.

लातूरकडून नांदेड कडे जाणारी आयचर क्र. एम एच 40 बी एल 4965 ही दि.15 रोजी रविवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास लोहा शहरात दाखल होत असताना आयचर समोर चालणाऱ्या अज्ञात वाहनाने शहरातील नाना नगर समोरील उतारावर गतिरोधक असल्याने वाहनाचा वेग कमी केला. मात्र, पाठीमागून येत असलेल्या आयचर वाहन हे भरधाव वेगात असल्याने सदरील आयचार हे समोरील अज्ञात वाहनावर जोराने आदळले. त्यात आयचर चालक कवडू मधुकर जांभुळे (वय 34) रा. माहुली ता.पारशिवणी जि.नागपूर हा स्टेरिंगमध्ये अडकल्या जावून जागीच ठार झाला. तर क्लिनर (नाव समजू शकले नाही) यास जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला.

हेही वाचा : आयपीएस अधिकारी अर्चित चांडक यांची धडाकेबाज कारवाई ! नांदेडच्या बिलोलीतील सगरोळीच्या वाळू घाटावरून तब्बल 38 ट्रक व 5 जेसीबी जप्त

दरम्यान जखमीला लोहा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला पाठविण्यात आले. याप्रकरणी सतीश दशरथ कुसुंबे यांनी दिलेल्या फिर्यादनुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोउपनि रेखा काळे या करीत असल्याची माहिती ठाणे अंमलदार गणेश येमेकर यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.