प्रेमाचा करूण अंत ! प्रेमीयुगुलाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या; भोकर येथील धक्कादायक घटना

3,936

नांदेड-

आदीलाबादहून मुंबईकडे निघालेल्या ‘नंदिग्राम एक्स्प्रेस’ रेल्वेखाली उडी घेऊन प्रेमीयुगुलानी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भोकर शहरातील रेल्वे गेटजवळ घडली आहे.

आदिलाबादहून मुंबईकडे जाणारी नंदिग्राम एक्सप्रेस रेल्वेगाडी शुक्रवार दि.11 रोजी दुपारी अंदाजे साडेतीन वाजेच्या सुमारास रेल्वेगेट जवळ आली. याचवेळी एक तरुण व एक तरुणी प्रेमीयुगुलाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली.धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याने तरुणाचे अक्षरशः धड वेगळे झाले तर तरुणी रेल्वे पटरीच्या बाजूला लांब फेकल्या गेली.घटनास्थळी जमावाची तुफान गर्दी झाली असून ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.रेल्वे प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.

शहराच्या मध्यभागी रेल्वे गेट असल्यामुळे या ठिकाणाहून नागरिकाची ये-जा मोठ्या प्रमाणात असते.दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव शिवराम मनोज क्यातमवार, वय 21, रा.भोकर व तरुणीचे नाव धारा माधव मोरे, वय 19, रा.रिठा ता.भोकर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.

सदरील घटनेची माहिती रेल्वे प्रशासनासनाकडून मुदखेड रेल्वे पोलीसांनी देण्यात आली असून माहिती मिळताच रेल्वे पोलीस स्थानकाचे ठाणेदार सुरेश वुनवने यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोकॉ संदीप पोपलवार, रेल्वे पोकॉ दत्ता मुगल, नाईक अनंता आघाव व सहकारी पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. दोघांचे मृतदेह शासकीय रुग्णालय भोकर येथे आणून शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी रेल्वे पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.