ग्लोबल इंग्लिश स्कूल मधील शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा न्यायाधीशांनी केला गौरव

303

लोहा, नांदेड –

शहरातील साई गोल्डन सिटी परिसरातील ग्लोबल इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव लोहा न्यायालयाचे न्यायाधीश अश्विनी डाखोरे यांच्या हस्ते एका विशेष कार्यक्रमात करण्यात आले.

जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे औचित्य साधून गुरुवारी ग्लोबल शाळेच्या प्रांगणात शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव लोहा न्यायालयाचे न्यायाधीश आश्विन डाखोरे यांच्या हस्ते करण्यात आला. शाळेतील पात्र विद्यार्थ्यांत स्नेहल महाबळे (६ वी), अनुष्का लामदाडे (६ वी), ओमकार व्यवहारे (६ वी), पार्थ चव्हाण (६ वी), अथर्व बच्चेवार (९ वी) आदींचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना न्या.डाखोरे म्हणाले, विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेत सहभाग घ्यावा आणि यशस्वी व्हावे.तसेच गुरुजनानी विद्यार्थ्यांना सकारात्मक विचाराकडे चालना द्यावी, असे मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ.दिपक मोटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक एन.मनोज कुमार, हेमा चालीकवार, विद्या साकनुरे आदींचे मार्गदर्शन लाभले.

गुणवंतांच्या यशाबद्द्दल संस्थेचे विनोद लोढा, शैलजा देशमाने, कौशल्या क्षीरसागर, आशा बेद्रे, सोनाली हंडे, अनिल बाबर, भारत ढगे, भाग्यश्री सोनवळे, माया देशमुख, जयश्री बोरले, मीरा क्षीरसागर, अखीब अहमद, गजानन लांडगे, मीरा किलजे, शैलेश गुरव, अवंती पारेकर, संगीता गवले, कैलाश चव्हाण, बाळू हंडे, काशिनाथ पांचाळ, ज्योती तरटे, उज्वला इंगळे आदींनी कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.