ठिणगी पेटली ; छ.संभाजीराजेंच्या उपोषणास नांदेडमधून पाठींबा.!
नांदेड –
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी छत्रपती संभाजीराजे आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषण करत असून त्यांच्या उपोषणाला नांदेड येथून पाठिंबा मिळत आहे.
सकल मराठा समाजाच्या न्याय हक्काकरिता प्रलंबित मागण्यांसाठी छत्रपती संभाजीराजे यांनी दि.२६ फेब्रुवारी पासून आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणास सुरुवात केली असून त्यांच्या मागण्या बाबत त्यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणून नांदेड जिल्ह्यात ही आंदोलनाची ठिणगी पेटली आहे.
दि.२६ शनिवार पासून जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे दत्ता श्रीकृष्णा सुर्यवंशी (रा.हडसणी ता. हदगाव) या तरुणाने ही मराठा समाजाच्या मागण्यांसाठी व संभाजी राजे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आमरण उपोषण सुरू केले असून जो पर्यंत छत्रपती संभाजीराजे यांचे आमरण उपोषण सुरू राहील. तो पर्यंत त्यांच्या समर्थनार्थ माझे ही आमरण उपोषण सुरूच राहील अशी मागणी निवेदनकर्ते दत्ता सुर्यवंशी यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली आहे. या उपोषणास शिवसेना नेते भुजंग पाटील यांनी भेट दिली आहे.
छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज संभाजी राजे हे मराठा समाजाच्या हितासाठी आमरण उपोषण करत असून शासनाने मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्या अन्यथा खेड्या-खेड्यांमधून मराठा समाज पेटून उठेल.
– दत्ता सुर्यवंशी,
उपोषणकर्ता