ट्रक जागेवरच पेटला, नांदेड शहर व परिसरात आगीच्या चार घटना; मोठा अनर्थ टळला, पाहा व्हिडिओ..

1,236

नांदेड –

 

दि. 28 एप्रिलच्या मध्यरात्री नांदेड शहर व परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या आगीत ट्रक, कडबा आणि महावितरणचा डीपी जळून खाक झाला. यात मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरातील देगलूर नाका परिसरात बरकत कॉम्प्लेक्स येथील असलेल्या डीपीला आग लागली. आग आणल्यानंतर लगेच अग्निशमन दलाला उस्माननगर रस्त्यावर वडगाव किवळा दरम्यान कडब्याच्या गंजीला आग लागल्याची माहिती समजली. अग्निशमन दलाने तात्काळ आपल्या वाहनासह घटनास्थळी जाऊन मारोती रामजी कल्याणकर यांच्या जवळपास पाच कडब्याच्या गंजीला लागलेली आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

त्यानंतर देगलूर रोडवरील धनेगाव येथील शेख तय्यब व अब्दुल अज्जु हमीद यांच्या भंगाराच्या गोदामाला आग लागली.आगीच्या जवळच घर असून शेजारीच फ्रीजचे गोदाम होते. तसेच बेकरीचे दुकान आहे. ही आग लवकर आटोक्यात आली नसती तर मोठा अनर्थ घडला असता. अग्निशमन दलाने आग वेळीच आटोक्यात आणली.

शहरातील चौथ्या घटनेत बाफना टी पॉईंट येथे मंजितसिंग यांच्या ट्रकला आग लागली. ट्रक क्रमांक एम एच 26 एडी 0478 जळून खाक झाला. शहरातील या सर्व आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अर्धापुरच्या नगर परिषद आणि नांदेड शहर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाने अथक परिश्रम घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.

Leave A Reply

Your email address will not be published.