नांदेड जिल्ह्यातील रस्त्यावरील बालकांचे होणार सर्वेक्षण  – जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांचे निर्देश

150

नांदेड –

नांदेड जिल्ह्यात रस्त्यावर राहणारे अनाथ, बेघर, रात्रनिवारा गृहातील, दिवसभर रस्त्यावर राहून रात्री जवळच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि कुटुंबासमवेत रस्त्यावर जी बालके राहतात त्यांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे याचे नियोजन केले गेले आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनेद्वारे या मुलांचे पूनर्वसन करण्यासाठी हे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्व बालकांची राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या (एनसीपीसीआर) या संकेस्थळावर नोंदणी केली जात आहे. त्यामध्ये ही मुले कुठून आली? ज्या कुटुंबासमवेत ती राहत आहेत ते त्यांचेच पालक आहेत का? बालमजूर म्हणून कार्यरत आहेत का? काही समाजकंटकाकडून मुलांना भिक मागण्यासाठी ही मुले बाहेरील जिल्ह्यातून किंवा परराज्यातून आणली जातात का? आदी बाबी तपासल्या जाणार आहेत.


 
अशी मुले आढळल्यास या मुलांचे बाल संरक्षण कक्षाकडून सामाजिक पार्श्वभूमी तपासणी अहवाल तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये त्यांचे शिक्षण, सध्याचे वास्तव, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ आणि इतर पार्श्वभूमी जाणून घेतली जाईल. या मुलांचे शिक्षण सुरू नसेल तर त्यांना शिक्षण प्रवाहात आणणे, पालकांचा शोध घेणे, निवाऱ्याची सोय करणे, काहींना सामाजिक संस्थामध्ये पाठविले जाणार आहे.
 
या मुलांना केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत ज्या योजना आहेत त्याचा लाभ त्यांना मिळवून देण्यात येणार आहे. यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कृती दलाची स्थापना झाली असून तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिका मुख्य अधिकारी बाल पोलीस पथकाचे कृतिशील सदस्य, अंगणवाडी सेविका, चाइल्ड लाईनचे सदस्य यांनी बालकांचे सर्वेक्षण करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सूचना दिल्या. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्या 9730336418  या व्हॉटसॲपनंबर वरूनही बालकांच्या संरक्षणाबाबत लिंक पुरवली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.