नांदेड जिल्ह्यातील माहुरातील तीन वाळू घाटांचा होणार लिलाव !

316

माहूर, नांदेड –

जिल्ह्यातील माहूर तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रातील 8 वाळू घाटापैकी पहिल्या टप्प्यात टाकळी, सायफळ, व लांजी या तीन वाळू घाटांचा लिलाव होणार आहे. या प्रक्रियेला सुरुवात झाली असून दिनांक 15 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष लिलाव पार पडणार असल्याची माहिती तहसीलदार किशोर किशोर यादव यांनी दिली.

राज्य पर्यावरण आघात निर्धारणाच्या 235 व्या बैठकीत राज्यातील 50 रेती घाटाच्या लिलावाला पर्यावरण समितीने मान्यता दिली. त्यानुसार दिनांक 1 ऑक्टोबर 2021 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीसाठी माहूर तालुक्यातील तीन वाळू घाटांचा लिलाव होत आहे. लिलाव प्रक्रियेत भाग घेऊ इच्छिणार्‍यांना सर्व पुराव्यानिशी व शंभर रुपयाच्या बॉण्डवर नोटरी करून स्वतःचे प्रतिज्ञापत्र आणि साक्षीदारांचे हमीपत्र वेबसाईट व संकेतस्थळावर पाठविणे अनिर्वाय असल्याचे तहसीलदार यादव यांनी कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.