स्पर्धेत टिकण्यासाठी कुंभार समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष द्यावे-विजयराव देवडे

173

अर्धापूर, प्रतिनिधी –

जिल्ह्यातील कुंभार समाजातील पालकांनी विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य करण्यासाठी शिक्षणाकडे लक्ष देणे ही काळाची गरज आहे असे आवाहन स्वाभिमानी कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष विजयराव देवडे यांनी केले आहे.

संत शिरोमणी गोरोबा काकांच्या मंदिर परिसरात कुंभार समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष विजयराव देवडे लहानकर तर प्रमुख पाहुणे म्हणुन शिवाजी पांगरेकर, विजयकुमार घुमाडे, दिगांबर शंगेपल्लु आदी मान्यवर उपस्थित होते. याच बैठकीत जिल्हा व तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

क्लिक करा व हेही वाचा :

लोह्यातील महाविद्यालयीन तरूणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला टिप्पर अखेर पोलिसांनी केला जप

जिल्हाकार्याध्यक्ष पदी गंगाधर गंगाधरे तसेच जिल्हा संघटक म्हणून गोविंद देवडे किनवट तालुकाध्यक्ष म्हणुन संतोष इस्तारी राजुरकर, ता.सचिव रुपेश नगनुरवार, ता. उपाध्यक्ष सुर्यकांत चटपिल्ले, कार्याध्यक्ष आनंदराव शेवाळे कोषाध्यक्ष मारोती पहाडे, सहसचिव प्रमेश्वर शेवाळकर, सदस्य मनोज हिवाळे,बाबुराव कानगुले, लक्ष्मण रामेलवार, अशोक आयलवार तर युवा तालुकाध्यक्ष देवानंद डुमपलू कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत डुमपलू, सचिन जगदिश अनारपलु, सल्लागार दिगांबर शंगेपलु आदींची निवड जाहीर करून नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी अध्यक्षीय समारोप करताना विजयराव देवडे लहानकर म्हणाले की जिल्ह्यातील गरिब कुंभार समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिगृह उपलब्ध करुन देण्याचा संकल्प असल्याचे सांगितले. ३० लाख रुपयाच्या कामास प्रारंभ झाला असून अजुन लागणारा निधी उपलब्ध करुन घेण्यास बांधिल आहे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती देवडे यांनी दिली तर आगामी संत शिरोमणी गोरिबा काकांची जयंती मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य मोटारसायकल रॅली काढुन असंख्य कुंभार समाज बांधवांच्या उपस्थितीत साजरी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विजयराव देवडे यांनी दिली तर जिल्ह्यातील सर्व कुंभार समाज बंधु भगिनीनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिवाजी पांगरेकर यानी केले तर प्रास्ताविक व आभार दिगांबर शंगेपलू यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.