अर्धापुरातील मालेगाव येथे दोन गटात किरकोळ कारणावरून हाणामारी, ५५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल; चार आरोपींना पोलीसांनी केली अटक

2,351
पंढरपूर येथे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनावरही केली दगडफेक

अर्धापूर, नांदेड –

अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे मोटारसायकलला कट मारण्याच्या कारणावरून किरकोळ भांडण झाले व गुरूवारी रात्री मिटले. शुक्रवारी दि.1 सकाळी दोन गटात पुन्हा बाचाबाची होऊन प्रकरण चिघळत गेले. वरिष्ठ पोलीस अधिकारी व आर.सी.टीचे जवान सध्या तैनात केले असून सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

मालेगाव येथे किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना दि.१ शुक्रवारी रोजी सकाळी घडली. या हाणामारीत दोन्ही गटातील काही जण जखमी झाले आहेत तर काही दुकानावर दगडफेक करून नुकसान केले आहे. परिस्थिती आटोक्यात आणतांना पोलीस कर्मचारी रामचंद्र जोशी, भिमराव राठोड, संदिप आनेबोईनवाड, पप्पू चव्हाण आदी कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोउनि बळीराम राठोड यांच्या फिर्यादीवरून २९ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मालेगाव येथील घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील घटनास्थळी पोहचले.

मालेगाव येथील सरपंचनगर पाटीजवळ गाडी चालवतांना किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. दोन्ही गटांनी गुरुवारी रात्री थेट अर्धापूर पोलीस स्टेशन गाठले. दोन्ही गटाच्या सहमतीने सदर प्रकरण शांत झाले होते. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी दूध घेऊन जाणाऱ्या एका सोबत पुन्हा बाजाबाची झाली व प्रकरण चिघळत गेले जमलेल्या जमावाने परिसरातील मोटरसायकल आदी वाहने व दुकानांचे मोठे नुकसान केले. तसेच पंढरपूर येथे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनावरही दगडफेक केल्याने काही जण किरकोळ जखमी झाले असल्याचे नागरिकांनी सांगितले.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात चौख पोलीस बंदोबस्त करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक एल.व्ही.राख, पोउपनिळीराम राठोड, पोउनि बाबुराव जाधव, म.तय्यब अब्बास, भिमराव राठोड, संतोष सुर्यवंशी, महेंद्र डांगे, कल्याण पांडे, सपोनी तुगावे ,पोउनि केसगे, संदिप आनेबोईनवाड, गुरुदास आरेवार, राजेश घुन्नर, बोईनवाड, बालाजी तोरणे, अर्जुन राठोड, सतिष लहानकर, ईश्वर लांडगे, अनिल गायकवाड आदींनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

मालेगाव हाणामारी प्रकरणी ५५ जणांवर गुन्हे दाखल

प्रशांत तुकाराम कुंटे रा. मालेगाव यांच्या फिर्यादीवरून २६ व इतर १५ ते २० सर्व रा.देगाव कु.यांच्यावर कलम १४३, १४७, १४८, १४९, ४५२, ३०७, ३२४, ३२६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील करीत आहेत व पोउनी बळीराम राठोड यांच्या फिर्यादीवरून २९ व इतर जणांवर १४३, १४७, १४८, १४९, ३३६, ३२४, ३२३, ३०७, ३५३ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक जाधव हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.