अर्धापूर तालुक्यातील खैरगांव सोसायटीच्या चेअरमन पदी बालाजीराव गव्हाणे यांची बिनविरोध निवड..!

519

अर्धापूर, नांदेड-

तालुक्यातील खैरगांव सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजीराव गव्हाणे पाटील यांची तर व्हाईस चेअरमन पदी बालाजी कल्याणकर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्वाचन अधिकारी संजय जळके, सहाय्यक सखाराम पवार यांनी करताच जल्लोष करण्यात आला.

खैरगाव सेवा सहकारी सोसायटी संचालक मंडळाची बैठक दि.2 शुक्रवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. याच बैठकीत चेअरमन पदासाठी बालाजीराव गव्हाणे, व्हाईस चेअरमन पदासाठी बालाजी कल्याणकर दोनच अर्ज आल्याने निवडणूक निर्वाचन अधिकारी चेअरमन व व्हाईस चेअरमन बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

निवड झाल्याची घोषणा होताच समर्थकांनी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष तथा चेअरमन बालाजीराव गव्हाणे, तर व्हाईस चेअरमन बालाजी कल्याणकर यांचा सत्कार करत जल्लोषात स्वागत केले. यावेळी संचालक मंडळ व गावातील प्रतिष्ठित नागरिक गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रा.प.सदस्य व गावकरी मंडळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.