अर्धापुरातील हिंदू समाजासाठी वैकुंठरथ नगरपंचायतीच्या वतीने उपलब्ध करून द्यावा-नगरसेवक शेख जाकीर

एक ते दोन किलोमीटर स्मशानभूमी असल्याने अडचण दूर करण्याची मागणी

624

अर्धापूर, नांदेड-

शहरातील अनेक भागात हिंदू समाज मोठ्या संख्येने विस्तारलेला आहे. या ठिकाणी मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी मयताचे राहते घर ते स्मशानभूमी असे एक ते दोन किलोमीटरचे अंतर पायी पार करावे लागते. अनेक वेळा मनुष्यबळ कमी पडल्याने मोठी अडचण निर्माण होते. वैकुंठरथा अभावी शहरातील नागरिकांची मरणोत्तर होणारी हेळसांड थांबावी व हिंदू बांधवांना अंत्यसंस्कारासाठी वैकुंठरथ मिळावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक शेख जाकीर यांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अर्धापूर शहरामध्ये हिंदू समाजाची २५ हजार संख्या आहे. हिंदू समाजामध्ये विविध जाती व धर्माचे लोक अर्धापूर शहरात राहत असुन यामध्ये गरीब व मध्यमवर्गीय वर्ग मोठ्या संख्येत आहे. या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास त्यांच्या घरी मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी पर्यंत नेण्यासाठी कधीकाळी मनुष्याची संख्या कमी पडते. काही हिंदू बांधवाची स्मशानभूमी घरापासून एक ते दोन किलोमिटर अंतरावर असल्याने त्यांना तेवढे अंतर गाठण्याकरिता नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस येत असल्याने जागोजागी सांडपाणी साचल्याने व पाऊस चालू असल्याने स्मशान भूमीपर्यंत अंत्ययात्रा नेण्यासाठी मोठी अडचण येत आहे. शहरातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील मयत व्यक्तीच्या अंत्यविधी दरम्यान अंत्ययात्रेसाठी एक ते दोन किमीचे अंतर पार पडावे लागते यासाठी लागणारी माणसे मिळत नाहीत. या सर्व बाबींकडे लक्ष देत मयताच्या अंत्ययात्रेसाठी वैकुंठरथ उपलब्ध करून द्यावा व मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी लागणारे साहीत्य नगर पंचायतीच्या फंडातून उपलब्ध करून द्यावे या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी नगर पंचायत अर्धापुर यांना राष्ट्रवादीचे नगरसेवक शेख जाकीर शेख सगीर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी नगरसेवक शेख जाकीर म्हणाले की, शहरातील हिंदू बांधवांची मरणोत्तर होणारी हेळसांड थांबावी त्यांना अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्य द्यावे व वैकुंठरथ तात्काळ मिळावा यासाठी सतत पाठपुरावा करण्यात येईल.जो पर्यंत वैकुंठरथ मिळणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असे शेख जाकीर म्हणाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.