कोल्हापूर उत्तरमधील विजयाचा काँग्रेस पक्षातर्फे माहुरात जल्लोष
माहूर, नांदेड –
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई जाधव यांचा भरघोस मतांनी विजय झाल्याने माहूर तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माहूर शहरात फटाके फोडून व पेढे मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी सोनिया गांधी,राहुल गांधी,सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील यांच्या जयजयकारच्या गगनभेदी घोषणा देत मोठ्या उत्साहात काँग्रेसच्या उत्तर कोल्हापूरच्या नवनिर्वाचित आमदार जयश्रीताई जाधव यांचे अभिनंदन करण्यात आले. राजेंद्र केशवे यांनी उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकित महाविकास आघाडीच्या उमेदवार काँग्रेसच्या जयश्रीताई जाधव यांच्या विजयाचे शिल्पकार महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी ना.जि.म.स. बँकचे संचालक माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक प्राचार्य राजेंद्र केशवे, विमुक्त जाती भटक्या जमाती सेलचे नांदेड जिल्हाध्यक्ष किसन राठोड, युवक काँग्रेस वैद्यकीय सहाय्यता आघाडीचे राज्य समन्वयक डॉ.निरंजन केशवे, काँग्रेस तालुका प्रवक्ते जयकुमार अडकीने, रहेमत अली, गोविंदराव मगरे पाटील, दत्तात्रेय शेरेकर, काँग्रेस शहर उपाध्यक्ष अनिल माडपेलीवार, युवक काँग्रेस किनवट माहूर विधानसभा अध्यक्ष अमोल केशवे, अतुल कडू पाटील, सलीम खाकरा, विधानसभा उपाध्यक्ष सचिन बेहरे, नगरसेवक प्रा.विलास भंडारे, विक्रम राठोड, निसार कुरेशी, राजु सौंदलकर, आकाश कांबळे, संजय आराध्ये, गोविंद आराध्ये, गुलाबराव आराध्ये, अमृत जगताप, युवक काँग्रेस शहराध्यक्ष राजकिरण देशमुख, शेख आयुब, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष द.म.देशमुख, दीपक मुरादे, सिद्धार्थ तामगाडगे, खाजा भाई, एनएसयुआय तालुकाध्यक्ष अजीम सय्यद, विमुक्त जाती भटक्या जमाती सेलचे माहूर तालुकाध्यक्ष सोनू राठोड, रमेशराव खरे, करिम शहा, प्रमोद राठोड, नृपेन खरे, अक्षय परसवाळे, अनिकेत मडावी, युनूस कुरेशी, जमीर सौदागर, जमीरभाई नागपूरवाले, सुरेश राठोड आदिसह काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.