नीट असो की सीईटी किंवा असो 12 वी बोर्ड “प्रत्येक निकालात” आयआयबीच अव्वल ! तब्बल 16 विद्यार्थ्यांना बायोलॉजी विषयात 100 पैकी 100 गुण

369

नांदेड / लातूर – 

नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12 वी बोर्ड -2022 परीक्षेत आयआयबी इन्स्टिटय़ूटच्या तब्बल 16 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.राज्यभरात शैक्षणिक दृष्टीने नांदेडचे व लातूरचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नांदेड आणि लातूर मध्ये मिळणारे दर्जेदार शिक्षण, विविध सोयी-सुविधा उपलब्ध असल्यामुळे शिक्षणासाठी राज्यभरातून विद्यार्थी हे नांदेड व लातुरात दाखल होत असतात.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल बुधवार, दि.8 जून रोजी जाहीर झाला. या परीक्षेच्या निकालात देशातील नामवंत शिक्षण संस्थेमध्ये नावलौकिक असलेल्या आयआयबी इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत तब्बल 16 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळविले आहेत. या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल आयआयबीचे मुख्य संचालक श्री बालाजी वाकोडे पाटील यांच्यासह संपूर्ण आयआयबी टीमने कौतुक करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी पैकीच्या पैकी गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया देतांना सांगितले की, या यशाचे सर्वाधिक श्रेय हे आयआयबी इन्स्टिट्यूटचे असून कारण येथील शिक्षण पद्धती अत्यंत प्रभावी आहे. नीट परीक्षेची तयारी करत असताना बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने येथील प्राध्याकांनी खूप छान मार्गदर्शन केले आणि नीट परीक्षेबरोबरच 12 वी बोर्ड परीक्षेला कसे सामोरे जावे, जास्तीत-जास्त मार्क्स कसे मिळतील याबाबत अनमोल असे मार्गदर्शन व 12 वी बोर्ड परीक्षेची तयारी करून घेण्यात आली. विविध चॅप्टर, युनिट निहाय नोट्स त्याचबरोबर जेंव्हा 12 वी बोर्ड परीक्षा जवळ आल्या तेंव्हा या बोर्ड परीक्षेची तयारी तसेच पेपर सोडवितांना वेळेचे तंतोतंत नियोजन या बाबींच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला बायोलॉजी विषयात 100 पैकी 100 गुण घेण्याचा मार्ग सुकर झाला असे मत सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.