जागतिक महिला दिनी अर्धापूर पोलीस ठाण्याचा पदभार महिलांच्या हाती

599
अर्धापूर, नांदेड –

अर्धापूर पोलीस ठाण्याचे मंगळवारी दिवसभराचं काम महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पाहिले. महिला दिनी दिवसभर आलेल्या तक्रारींचे निवारण महिला कर्मचाऱ्यांनीच केले. अर्धापूर पोलीस ठाण्यात दिवसभर महिलाच ठाणेदार बनल्या होत्या.

जागतिक महिला दिनानिमित्त दि.८ मार्च मंगळवार रोजी अर्धापूर पोलीस ठाण्यात पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनी अभिनव उपक्रम राबिवला. यावेळी पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरीकांचे आणि त्यांच्याकडून येणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्याचे काम महिला पोलीस कॉन्स्टेबल इंदुमती गवळी यांनी केले. ठाणे अंमलदारची जबाबदारी विद्यावती कापसे यांनी बजावली तर त्यांना साह्य महिला पोलीस कर्मचारी म्हणून अश्र्विनी गोडबोले यांनी मदत केली. यावेळी आलेल्या तक्रारींचे निवारण करत कायदा व सुव्यवस्था आदी कामकाज बघितले.

अर्धापूर पोलीस ठाण्याचा एक दिवसाचा पदभार सांभाळणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा महिला दिनानिमित्त सन्मान व सत्कार पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी केला. यावेळी पोउनि. बळीराम राठोड, पोउनि.साईनाथ सुरवसे, पोउनि.कपिल आगलावे, जमादार राजेश वरणे,एस.बि.गोणारकर, राजेश घुन्नर, गुरूदास आरेवार, महेंद्र डांगे, कल्याण पांडे आदी पोलिस अधिकारी कर्मचारी यांनी अभिनंदन केले. यावेळी पत्रकार सखाराम क्षिरसागर, गोविंद टेकाळे, संदिप राऊत आदी उपस्थित होते. पोलिस प्रशासनाने महिला दिनी राबविलेल्या या अभिनव उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.