नांदेड ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत गावठी पिस्तूलासह युवकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1,328

नांदेड –

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बळीरामपुर येथे एका युवकाकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. यानुसार येथे पथकाने छापा टाकून युवकास गावठी पिस्तूलासह अटक केले आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे नोंद होत आहेत.मात्र, अजूनही पिस्तूल सापडतच आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिलेल्या आदेशानुसार गुन्हेगाराचा शोध घेण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दि.4 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरुन सिडको भागातील बळीरामपूर येथून नामदेव तुळशीराम शिवभक्ते, वय 22 वर्ष या युवकाची झडती घेतली असता कमरेला 20,000 रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल आढळून आले.

याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये सदर युवकाविरुध्द पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पांडूरंग माने, पोउनि दत्तात्रय काळे, सचिन सोनवणे, पोहेकॉ गुंडेराव करले, पोना अफजल पठाण, बालाजी तेलंग, मपोना हेमवती भोयर, पोकॉ विलास कदम, गणेश धुमाळ, हेमंत बिचकेवार यांनी सहभाग घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.